धक्कादायक ! जन्मदात्याने पोटच्या मुलीवर अत्याचार करून विष पाजले

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाण्यात एक संतापजनक घटना घडली आहे. यामध्ये पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून नराधम बापाने पीडित मुलीला विष पाजले आहे. या प्रकरणी नराधम पित्याविरुद्ध रायपूर पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. हि घटना २७ मे रोजी घडली आहे. १६ वर्षांची मुलगी एकटी घरी असताना ४१ वर्षीय बापाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यानंतर याबाबत कोणाला सांगितले तर ठार मारण्याची धमकी देऊन तिला मारहाणसुद्धा केली.

हा नराधम बाप एवढ्यावरच थांबला नाही त्याने अत्याचाराचा प्रतिकार करणाऱ्या मुलीला विषारी औषधदेखील पाजले. यानंतर या पीडित मुलीला उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलिसांनी बुलडाणा सामान्य रुगणालयात जाऊन पीडितेचा जबाब नोंदविला.

यानंतर रायपूर पोलीस ठाण्यात आरोपी नराधम बापाविरोधात बलात्कार, पोक्सो व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर तातडीने कारवाई करत नराधम बापाला पोलिसांनी काल रात्री अटक केली आहे. या आरोपी बापाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसा पोलीस कोठडी सुनावली आहे.