सोलापुरात लेखक गिरीश कुबेर यांच्या पुतळ्याचे दहन : छ. संभाजी महाराजांच्या बद्दल वादग्रस्त लिखाण

सोलापूर | छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल वादग्रस्त लिखाण करणार्‍या लेखक गिरीश कुबेर यांचा सोलापुरात पुतळा दहन करण्यात आला. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कुबेरांचा पुतळा जाळून त्यांना सोलापुरात पाय न ठेवू देण्याचा इशारा राष्ट्रवादीचे माजी उपमहापाैर दिलीप कोल्हे यांनी दिला आहे.

लेखक गिरीश कुबेर यांनी आपल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेले वादग्रस्त लिखाण मागे घेण्यात यावे या मागणीसाठी सोलापुरात आंदोलन करण्यात आले आहे. तसेच पुण्यात येवून कुबेरांना काळे फसण्याचा इशारा देखील यावेळी मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

सोलापुरातील संभाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात आंदोलन करण्यात आले. तसेच गिरीश कुबेर यांनी जे वादग्रस्त लिखाण केले ते अतिशय निंदनीय आहे. त्यामुळे त्यांच्या पुतळ्याचे आम्ही दहन केले आहे. शासनाला आमची विनंती आहे हे पुस्तकातील लिखाण रद्द करावे, अन्यथा पुढील आंदोलन उग्र करणार असल्याचे दिलीप कोल्हे यांनी सांगितले.

खालील LINK वर आंदोलनाचा  व्हिडिअो पहा. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/125252539608446

You might also like