‘राधे’साठी नव्हे, तर या कारणामुळे KRK वर केली केस; भाईजानच्या वकिलांकडून मोठा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्वयंघोषित समिक्षक आणि अभिनेता कमाल आर खान अर्थात KRK आणि भाईजान अर्थात सलमान खान यांच्यात नुकताच तापलेला वाद समोर आला आहे. तर सलमानने त्याचा बहूचर्चित चित्रपट ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाबाबत कमालने दिलेल्या नकारात्मक टिप्पणी आणि समीक्षांमुळे त्याच्यावर कारवाई केली असे कमालने अर्थात KRKने सांगितले होते. या कारवाईनंतर तर वेडापिसा होत त्याने अनेक ट्वीट्सदेखील केलीये होते. पण आता हा सगळं तमाशा खोटा असल्याचे समोर येत आहे. याबाबत सलमान खानच्या वकिलानेच खुलासा केला आहे.

राधे चित्रपटाबाबत दिलेल्या रिव्हू किंवा समीक्षांसाठी नव्हे तर कमाल खानने सलमान खान आणि त्याच्या वैयक्तिक अनेक गोष्टींविरोधात केलेल्या जीभ उचल बदनामीमुळे त्याच्यावर मानहानीची केस करण्यात आली आहे. याबाबत सलमानच्या वकिलांकडून असे सांगण्यात आले आहे की, ‘कमाल खान सातत्याने सलमान खानची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच बदनामी करण्याच्या हेतूने अनेक विविध खोटेनाटे आरोपही करत आहे. याशिवाय तो सलमान खानचा अधिकृत ब्रँड ‘बीइंग ह्युमन’ यालाही फ्रॉड अर्थात फसवा असे म्हटला आहे. तसेच या ब्रँडतर्फे पैसे दाबले गेले आहेत असेही त्याने म्हटले होते.’

https://twitter.com/kamaalrkhan/status/1397896363040456704

पुढे, याउपर जाऊन त्याने सलमान खानची आणखीही बदनामी केली होती. ‘सलमान खान आणि सलमान खान फिल्म्स (SKF Production) हे एक गुंड व गुंडखाते आहे, असे वक्तव्य देखील त्याने केले होते. तसेच गेल्या काही महिन्यापांसून तो सातत्याने सलमान खानची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे.’ असे सलमान खानच्या वकिलाने सांगितले आहे. यानंतर केआरकेच्या वकीलाने यावर प्रतिक्रिया डेटनं म्हटले आहे कि, ‘कमाल आर खान यापुढे पुढील तारखेपर्यंत त्यांच्याबाबत कोणतीही अपमानजनक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करणार नाही.’ यावरून स्पष्ट होते कि, राधेच्या रिव्हूमुळे नाही तर केआरकेने सलमानची वैयक्तिकरित्या केलेली बदनामी त्याच्या अंगलट आली आहे. ज्याच्या फलस्वरूप त्याच्यावर मानहानीची केस करण्यात आली आहे.

केआरकेने यानंतरही सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून आपल्या अधिकृत हॅण्डलवरून ट्वीचट्सची पुन्हा एक नवी मालिका सुरू केली आहे. त्याने अगदी नुकत्याच केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘कोर्टाने मला सलमान खान किंवा त्याच्या लीगल टीम विषयी बोलण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आता मी त्यांना उत्तर देऊ शकत नाही. पण पुढील सुनावणी नंतर एक ७ मीनिटांच्या व्हिडीओमध्ये मी त्यांना उत्तर देणार’ असल्याचे त्याने पुन्हा एक वक्तव्य केले आहे. KRK अश्या पद्धतीने तर खांजवून कळी काढत राहिला तर नक्कीच हा वाद विकोपाला जाण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Comment