कर्नाटक परिवहन मंडळाच्या आराम बसला आग; 30 प्रवाशी बचावले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बेळगाव येथून बेंगलोरकडे निघालेल्या कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या कोरोनो या आरामदायी बसला सकाळी 7:15 वाजता बेंगलोर येथे आग लागली. नेलमंगल टोलनाक्यावर तांत्रिक कारणामुळे ही आग लागली.

या बसमधील 30 प्रवाशी सुखरूप असून तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागल्याचे राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे या आगीमध्ये बसचे नुकसान झाले असून 30 प्रवाशी सुखरूप आहेत. तांत्रिक बिघाड हे आगीचं प्राथमिक कारण सांगण्यात येत असलं तरी परिवहन खात्याच्या दुर्लक्षामुळे आणि देखभालीअभावी ही घटना घडल्याचं समोर आलं आहे.