हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business : नोकरी करणारी कोणतीही व्यक्ती पगाराव्यतिरिक्त अतिरिक्त उत्पन्नाच्या शोधात असते. सध्याच्या काळात अशा लोकांसाठी घरबसल्या चांगल्या कमाईच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. सध्याच्या सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या युगात लोकांना घरून काम करण्यासोबतच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्याही अनेक संधी आहेत. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेले अनेक ट्यूटर, यूट्यूबर, काउंसलर आणि टीचर ऑनलाइन माध्यमातून भरपूर पैसे मिळवत आहेत. यातील काहींनी तर याला आपला फुलटाइम जॉबच बनवला आहे.
मोठ्या कंपन्यांसाठी फ्रीलान्सिंग
जर आपण व्हिडीओ एडिटर, कंटेंट रायटर, डेव्हलपर, ग्राफिक डिझायनर असाल किंवा आपल्याकडे एखादे असे कौशल्य असेल ज्याची मार्केटमध्ये खूप मागणी आहे, तर आपल्याला अनेक कंपन्यांसाठी फ्रीलान्सर म्हणून काम करता येईल. आजकाल असे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत जिथे फ्रीलांसिंग नोकऱ्या उपलब्ध आहेत. Business
सुरू करा स्वतःचे YouTube चॅनल
जर आपल्याकडे एखादे कौशल्य असेल आणि त्याद्वारे आपण इतरांचे मनोरंजन करू शकाल असे वाटत असेल. तर आपण त्याचे व्हिडिओ बनवून आपल्या YouTube चॅनेलवर अपलोड करा. आजकालच्या ट्रेंडमध्ये मोटो व्हिलॉगिंग, प्रोडक्ट, चित्रपट, गाणी, फूड रिव्यू, गेमिंग व्हिडिओ, टिप्स आणि ट्रिक्स व्हिडिओ, स्वयंपाकाचे व्हिडिओ आणि डान्स किंवा गाण्याच्या व्हिडिओना YouTube वर चांगले काफॉलोअर्स मिळतात. याद्वारेही आपल्याला दरमहा हजारो रुपयांची कमाई करता येईल. Business
बाहेरील प्रवाशांसाठी होस्टिंग
जर आपल्या घरी एखादी अतिरिक्त खोली असेल तर ती आपल्या शहरात राहण्यासाठी छान ठिकाणे शोधत असलेल्या प्रवाशांना भाड्याने देता येईल. यासाठी Airbnb हे एक महत्त्वाचे प्लॅटफॉर्म आहे जिथे आपले घर आणि पत्त्याशी संबंधित माहिती देऊ शकता. याद्वारे ज्या लोकांना रस असेल ते प्रवासी थोड्या कालावधीसाठी आपली खोली बुक करू शकतील. तसेच याद्वारे आपल्याला चांगले पैसेही मिळतील. Business
ऑनलाइन सपोर्ट आणि काउंसेलिंग
सहसा लोकांना कामाच्या दरम्यान किंवा जीवनातील कोणत्याही समस्येबाबत एखादा सल्ला आणि सपोर्टची गरज असते. जर आपण अशा सर्व प्रकारच्या कामांसाठी मदत किंवा सल्ला देऊ शकत असाल तर आपण ऑनलाइन काउंसेलिंगचे काम घरबसल्या करू शकाल. Business
ऑनलाइन कोचिंग
जर आपल्याला शिकवण्याची आवड असेल आणि एखाद्या विशिष्ट विषयावर आपली चांगली पकड असेल, तर आपण विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवून पैसे मिळवता येतील. असे करण्यासाठी आपल्याला Youtube किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग साइट वापरता येईल. Business
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.freelancer.in/
हे पण वाचा :
Bank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले FD वरील व्याजदर, नवीन दर तपासा
Credit Card मधून पैसे काढणे कितपत योग्य आहे ??? ही सुविधा कधी वापरावी ते जाणून घ्या
Post Office च्या बचत योजनांवर आता मिळणार जास्त व्याज !!!
PNB ने सुरू केली WhatsApp बँकिंग सर्व्हिस, आता घरबसल्या एकाच मेसेजद्वारे करता येणार ‘ही’ कामे
WhatsApp द्वारे अशा प्रकारे पाठवता येतील 2 GB पर्यंतचे चित्रपट !!!