हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : आधी कोरोना आणि आता रशिया-युक्रेन मधील युद्धामुळे जगभरात मंदीचे वातावरण आहे. कोरोना मुळे आधीच अनेक जणांना आपल्या गमवाव्या लागल्या आहेत. अशातच महागाई देखील वाढतच आहे. अशा अनिश्चिततेच्या वातावरणात जर आपल्याला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी पैसे उभे करणे खूप अवघड झाले आहे. मात्र आज आपण एका अशा व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला जगभरात खूप मागणी आहे आणि याद्वारे आपल्याला भरपूर पैसे देखील मिळतील.
तर आज आपण केसांच्या व्यवसायाबाबत जाणून घेणार आहोत. जगभरातील अनेक लोकं याद्वारे चांगले पैसे कमावत आहेत. आजकाल भारतातही हा व्यवसाय चांगलाच लोकप्रिय होऊ लागला आहे. आता तुम्हांला हे जाणून आश्चर्य वाटेल कि, या केसांच्या व्यवसायात भारताचे योगदान खूप मोठे आहे. भारतातून परदेशात जवळपास ४० लाख डॉलर्सचे केस पाठवले जातात. एकट्या २०२० या वर्षात भारतातून पाठवण्यात येणाऱ्या सप्लायमध्ये तब्ब्ल ३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आपल्याला ठावुकही नसेल आपल्या केसांची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. Business Idea
मात्र हे लक्षात घ्या कि, केसांच्या क्वालिटी नुसार त्याची किंमत ठरवली जाते. काही केसांना ८,००० ते १०,००० पर्यंतची किंमत मिळते. तर चांगली क्वालिटी असलेल्या केसांना २०,००० ते २५,००० रुपये मिळतात. आंध्र प्रदेश, कोलकाता आणि चेन्नई येथे केसांचे होलसेल मार्केट आहे. येथील व्यापारी होलसेल भावात केसांची खरेदी करतात. त्यानंतर ही केसं परदेशात विकली जातात. एका रिपोर्ट नुसार कोलकाता येथून सर्वाधिक केसं ही चीनमध्ये पाठविली जातात. गुजरात मधील केसांना सर्वाधिक मागणी असते असे म्हंटले जाते. Business Idea
या केसांचा वापर हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी आणि विग बनवण्यासाठी केला जातो. मात्र त्याआधी ही केसं स्वछच धुतली जातात. यानंतर त्यांना केमिकल मध्ये ठेवले जाते. यानंतर त्यांवर ट्रीटमेंट करून ते चीनला पाठविले जातात. मात्र यामध्ये अर्धवट कापली गेलेली केसं चालत नाही. यामध्ये केसांची लांबी ही ८ इंचापेक्षा कमी नसली पाहिजे. या व्यवसायासाठी केसांची क्वालिटी खूप महत्वाची ठरते. यामध्ये कोणताही रंग न लावलेल्या आणि कोणतीही ट्रीटमेंट न केलेल्या केसांना खूप मागणी आहे. ज्यांना व्हर्जिन हेअर असे देखील म्हंटले जाते. भारतातून परदेशात पाठविण्यात येणारी केसं याच कॅटेगिरीमध्ये येतात. Business Idea
या केसांना चीन, ब्रिटन, युरोप आणि अमेरिका येथे खूप मागणी आहे. ही मागणी मुख्यत्वे मंदिरांतून जाणाऱ्या केसांद्वारे पूर्ण केली जाते. २०१४ साली एकट्या तिरुपती मंदिरातून सुमारे २२० कोटी किंमतीच्या केसांची विक्री झाली. २०१५ मध्ये देखील तिरुपती मंदिराने श्रद्धाळू लोकांच्या केसांची एका ई-लिलावाद्वारे विक्री करून ७४ कोटी रुपये जमा केले होते. Business Idea
हे पण वाचा :
PM Kisan : आता घरबसल्या अशा प्रकारे पूर्ण करा e-KYC
Gold Price Today : सोन्यामध्ये वाढ तर चांदी मध्ये घसरण
खुशखबर !!! Vi 151 रुपयांत देणार 8GB डेटा अन् Disney + Hotstar सबस्क्रिप्शन
BSNL ग्राहकांसाठी आंनदाची बातमी !!! आता ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार डेली 2GB डेटा