शिवसेनेकडून संजय पवारांना उमेदवारी निश्चित ; संजय राऊतांचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती आज कोल्हापुरात दिली. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेकडून राज्यसभा खासदारकीसाठी कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिकृत घोषणा करतील, असे मोठे विधान राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, संजय पवार यांना उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय झालेला आहे. महाराजांना पक्षाचे वावडे नसावे त्याच्याकडे जर ४२ मते असतील तर ते निवडून येतील. मात्र, शिवसेनेने आता पवारांना उमेदवार म्हणून निश्चित केले आहे. आता याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होईल.

संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे. मावळे असतात म्हणून राजे असतात असे सांगत उद्धव ठाकरेंनी या मावळ्याला उमेदवारी द्यायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यसभेच्या दहाव्या जागेचा चाप्टर आपल्यासाठी क्लोज झालेला आहे. शेवटी मावळा असल्या शिवाय राजे कसे असतील, पक्ष कसे असतील याचाही विचार करणे गरजेचे आहे, असेही राऊत यांनी म्हंटले.

संभाजीराजेबद्दल काय म्हणाले राऊत?

यावेळी संभाजीराजे यांच्याबद्दल संजय राऊत यांनी मत आपली भूमिका मंडळी. ते म्हणाले की, “एकनाथ ठाकूर हे कडवट शिवसैनिक होते. सामनाच्या उभारणीतही त्यांचा वाटा आहे. प्रियंका चतुर्वेदी या शिवसेनेच्याच उमेदवार आहेत. प्रितिश नदी हे देखील शिवसेनेचेच उमेदवार होते. ते पक्षाचे सदस्य आणि पक्षाचेच उमेदवार होते. वरिष्ठ शाहू महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शाहू महाराज हे सुद्धा पक्षाच्या तिकीटावर लोकसभा लढले आहेत. मालोजीराजे भोसले हे देखील पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले आहेत. स्वत: संभाजीराजे राष्ट्रवादीच्या तिकीटावरुन कोल्हापुरातून निवडणूक लढले आहेत. त्यामुळे राजांना कुठल्या पक्षाचे वावडं नसावं, देशातही अनेक राजघराण्यातील लोक अनेक पक्षाच्या तिकीटावर लोकसभा आणि राज्यसभेवर आहेत, असही संजय राऊत म्हणाले,

संभाजीराजे काय म्हणाले?

संभाजीराजे छत्रपती यांनी आज माध्यमांशी संवाद साधत महत्वाचे विधानही केले. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल माझी सविस्तर चर्चा झाली आहे. पुढे काय करायचं ते ठरलं आहे. मला खात्री आहे कि ते छत्रपती घराण्याचा नक्कीच सन्मान करतील याची मला खात्री आहे, असे महत्वाचे विधान संभाजीराजेंनी केले.

Leave a Comment