ICICI बँक देतेय म्यूचुअल फंडावर १ करोड पर्यंतचे कर्ज; घरबसल्या मिळवा फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI बँकेने आपल्या ग्राहकांसाठी नुकतीच एक विशेष योजना आणली आहे. याअंतर्गत, त्यांचे ग्राहक हे debt and mutual funds वर 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. Insta Loans against Mutual Funds नावाच्या या योजनेत त्यांना घरात बसूनच कर्ज मिळू शकते.

बँकेचे लाखो जुने ग्राहक या म्युच्युअल फंड योजनेचा लाभ घेऊ शकतात. याचा फायदा फक्त त्या ग्राहकांना होणार आहे ज्यांच्याकडे सीएएमएस सर्व्हिस केलेल्या म्युच्युअल फंडाच्या युनिट्सची होल्डिंग आहे. यामध्ये आपल्याला जेवढे कर्ज हवे आहे तेवढेच युनिट्स आपल्याला तारण ठेवून रक्कम निश्चित केली जाते.

त्याच्या प्रक्रियेबद्दल जाणून घ्या …

ICICI बँकेच्या इंटरनेट बँकिंगमध्ये लॉग इन करा.

Invest and Insurance वर जा आणि Loan against Mutual Funds वर क्लिक करा.

Pre-qualified eligibility तपासा.

Type of Mutual Fund निवडा.

CAMS पोर्टल वर रिक्वेस्ट कंफर्म करा.

Mutual fund योजना आणि युनिट निवडा.

नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर OTP मार्फत रिक्वेस्ट कंफर्म करा.

आता कर्जाची रक्कम ठरवा.

आकारल्या जाणाऱ्या व्याजदराचा दर काय असेलः

बँकेच्या वेबसाइटनुसार, इक्विटी म्युच्युअल फंडावरील व्याज दरवर्षी 9.90 टक्के आणि म्युच्युअल फंडावरील व्याज दरवर्षी 9.40 टक्के राहील. याशिवाय 500 रुपये प्रोसेसिंग फी आणि जीएसटी देखील भरावे लागतील.

सुविधा: ग्राहक कोणत्याही वेळी प्रिंसिपल अमाउंट भरू शकतात, त्यावर foreclosure शुल्क आकारले जाणार नाही. हे कर्ज ओव्हरड्राफ्ट म्हणून उपलब्ध आहे, त्यामुळे कोणतेही निश्चित EMI नाही. जितके दिवस जितके पैसे वापरले गेले तेवढ्याच रकमेवर व्याज आकारले जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment