हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । iPhone 11 : Apple चे फोन वापरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस चांगलीच वाढ होते आहे. सध्याच्या काळात अनेक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सवर यासाठी अनेक ऑफर्स देखील देण्यात येतात. आताही Apple iPhone 11 फ्लिपकार्टवर 50 टक्क्यांहून जास्त सवलतीमध्ये उपलब्ध आहे. 2019 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या या हा स्मार्टफोनची किंमत 64,900 रुपये ठेवण्यात आली होती. मात्र iPhone SE 3 5G च्या विक्रीवर परिणाम होत असल्याने काही महिन्यांपूर्वीच कंपनीकडून Apple iPhone 11 बंद करण्यात आला.
एक स्वस्त प्रीमियम स्मार्टफोन म्हणून आतापर्यंत Apple iPhone 11 हा उपलब्ध होता. तसेच फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल आणि एमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यानही या स्मार्टफोनला ग्राहकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अशातच आता हा आयकॉनिक iPhone 11 Flipkart वरून 21,000 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
किती सूट मिळेल ???
हे लक्षात घ्या कि, 3,991 रुपयांच्या सवलतीनंतर Apple iPhone 11 फ्लिपकार्टवर 39,999 रुपयांमध्ये मिळतो आहे. यासोबतच फेडरल बँकेच्या डेबिट कार्डद्वारे ग्राहकांना 10 टक्के म्हणजेच 1,500 रुपयांपर्यंतची इन्स्टंट सूटही मिळू शकेल. यानंतर या फोनची किंमत 38,499 रुपये होईल. याशिवाय, आपला जुना स्मार्टफोन एक्सचेंज करूनही 17,500 रुपयांपर्यंतची सूट मिळवता येऊ शकेल.
म्हणजेच, 22,991 रुपयांच्या सवलतीनंतर Flipkart वरून ग्राहकांना हा फोन फक्त 20,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. iPhone 11 हे Apple च्या एक लोकप्रिय मॉडेलपैकी एक होते. मात्र iPhone 14 सिरीज लॉन्च झाल्यानंतर तो बंद करण्यात आला.
आयफोन 11 चे फीचर्स जाणून घ्या
Apple iPhone 11 च्या फीचर्स बाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये 6.1-इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्लेबरोबर A13 बायोनिक प्रोसेसर मिळेल. तसेच त्याच्या मागील बाजूस 12MP चे दोन कॅमेरे आणि सेल्फीसाठी 12MP कॅमेरा देण्यात आला आहे. फ्लिपकार्टवरून ग्राहकांना हा फोन ब्लॅक, ग्रीन, पर्पल, रेड, व्हाइट आणि यलो कलमध्ये खरेदी करता येईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.flipkart.com/apple-iphone-11-black-64-gb/p/itm4e5041ba101fd
हे पण वाचा :
आता WhatsApp वरही मिळणार फेसबुक-इन्स्टाग्रामचे ‘हे’ फीचर, मार्क झुकरबर्गने दिली माहिती
Ola ने लाँच केली डिसेंबर टू रिमेंबर ऑफर, झिरो डाउन पेमेंटसोबत 1 वर्षासाठी मिळणार फ्री चार्जिंग
Car Discount Offer : चारचाकी घेण्याचं स्वप्न असेल तर 31 डिसेंबरपर्यंत घ्या निर्णय; ‘या’ गाड्यांवर 1.50 लाख…
FD Rates : ‘या’ दोन बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 9% पेक्षा जास्त व्याज
Gold Price Today : सोन्या-चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर