हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । सध्याच्या ऑनलाईन जगात ज्याप्रमाणे सोयीसुविधा वाढल्या त्याचप्रमाणे फसवाफसवीचे प्रमाणही वाढले आहे. अशाच एक नव्हे तर २ धक्कदायक घटना पुण्यात घडल्या आहेत. पुण्यातील सुकांता हॉटेलची थाळी एकावर एक फ्री देण्याची फसवी ऑफर देत दोघांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आलं आहे. याप्रकरणी आता पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले असून तपास करत आहेत.
नेमकं काय घडलं ?
पुण्यातील कोरेगाव परिसरात राहणाऱ्या 39 वर्षीय सुशील कुमार खंडेलवाल यांच्या पत्नीने ऑनलाईन सुकांता हॉटेलची जाहिरात बघितली. एका थाळीवर एक थाळी फ्री देणार अशी ती जाहिरात होती. त्या जाहिरातीवर फोन नंबर देखील देण्यात आला होता. त्या नंबरवर त्यांच्या पत्नीने फोन केला असता त्यांना झेडओएचओ नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितलं. त्यानुसार त्यांनी ते अॅप डाऊनलोड केलं. त्यानंतर ऑर्डर साठी लागणारे सर्व पेमेंट डिटेल्स त्यांनी त्यामध्ये टाकले. त्यानंतर काही वेळात त्यांना बॅंक खात्यातून 2 लाख 2 हजार रुपये दुसऱ्याच्या खात्यात जमा झाल्याचा मेसेज आला. हे पैसे त्या भामट्याच्या खात्यात जमा झाले होते. या फसवणुकीनंतर त्यांनी त्यांनी लगेच या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी बॅंकेशी संपर्क साधला. त्यानुसार बॅंकेने कारवाई करत 50 हजार रुपये परत मिळवले.
दुसऱ्या घटनेत ३ लाख ३४ हजारांना गंडा
अशीच एक घटना अजून एका व्यक्तीसोबत घडली त्याचे नाव विनोद आचारी आयटी कंपनीत काम करणाऱ्या विनोद आचारी यांच्या फेसबुकवर सुकांता थाळीची जाहिरात आली होती. जाहिरात पाहत असतानाच त्यांना फोन आला आणि अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यांनीही सेम प्रोसेस करत पेमेंट साठी क्रेडिट कार्डचा नंबर टाकला. त्यानंतर लगेच त्यांच्या खात्यातून तब्बल 10 वेळा पैसे कट झाले. ऐकून 4 लाख 86 हजार रुपये आरोपीच्या खात्यात जमा झाले. त्यातील 1 लाख 34 हजार रुपये परत मिळले आहेत.