लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात झालॆल्या आंदोलनाला हिंसात्मक वळण मिळाले आणि यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. योगी सरकार आंदोलकांकडून नुकसान भरपाई वसूल करत आहे. याच दरम्यान, बुलंदशहरमध्ये मुस्लिम समाजातील लोकांनी 20 डिसेंबर रोजी झालेल्या हिंसाचाराची भरपाई करण्यासाठी 6.27 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जिल्हा प्रशासनाकडे सोपविला आहे.
“Our ability to reach unity in diversity will be the beauty and the test of our civilization” – Gandhi
Peaceful protests across the nation against #CAA_NRC_NPR shows that none of the communites roots for hatred & violence but is adamant for their beliefs & rights.#Bulandshahr pic.twitter.com/3FXGEyMfQK
— Bharat (@bharatspeaks_in) December 27, 2019
यूपी पोलिसांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. मुस्लिम पुरुषांच्या गटाने 6,27,507 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट सरकारी अधिकाऱ्यांकडे दिला आहे. त्याचबरोबर डीएम-एसएसपी यांनी मुस्लिम समाजातील लोकांच्या या उपक्रमाचे कौतुकही केले आणि उत्तर प्रदेशातही या चरणची उदाहरणे दिली जातील असे सांगितले.
दुसरीकडे, सरकार म्हणते की, 20 डिसेंबर रोजी बुलंदशहरमध्ये झालेल्या हिंसाचारात प्रशासनातील एक वाहन जळाले आणि बर्याच वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणात 3 एफआयआर नोंदविण्यात आले. हिंसाचार प्रकरणी 22 जणांविरूद्ध आणि 800 अज्ञात लोकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.