अखेर शिंदे–फडणवीस सरकारचा पार पडला मंत्रिमंडळ विस्तार; ‘या’ दिग्गज नेत्यांनी घेतली शपथ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे- भाजप सरकारचा तब्बल 38 दिवसानंतर आज राजभवनावर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिंदे गटातील 9 आणि भाजपचे 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यावेळी शिंदे गटाकडून दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, उदय सामंत, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, दादा भुसे, शंभुराज देसाई, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, विजयकुमार गावित, अतुल सावे आणि रवींद्र चव्हाण यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याचे थेटप्रसारण

एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस या दोघांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. तब्बल 38 दिवस उलटूनही मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत होती. त्यानंतर अखेर आज शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. आज शिंदे गटाकडून 9 आणि भाजपकडून 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.