घरावर याल तर यापुढे सोडणार नाही; नारायण राणेंचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांचा आजचा जन आशीर्वाद यात्रेचा शेवटचा दिवस असल्याने त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर घणाघाती टीका केली. “मी गप्पही बसणार नाही. बाळासाहेबांना धोका होता तेव्हा साहेबांनी मला माझ्या लोकांना घेवून बोलवले. साहेब अज्ञातस्थळी असताना मी त्यांच्याबरोबर होतो.. असे सांगत राणे यांनी वरुण सरदेसाई यांच्यावर निशाणा साधला आहे. आता मुलांवर आला आहात. पुन्हा घरावर याला तर याद राखा. घरावरील हल्ला विसरणार नाही,” असा इशारा राणेंनी दिला आहे.

जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्यावर कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांच्याकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान त्यांनी आज पुन्हा शिवसेनेवर टीका केली. तर शिवसेना युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांच्यावर टिका केली आहे. त्यांनी सरदेसाई यांना इशारा दिला आहे. माझ्या घरावर आले. आता मुलांवर आले. हे मी विसरणार नाही. याची मी दखल घेतली आहे. आता यापुढे जर घरावर याला तर मी सोडणार नाही, असा इशारा राणेंनी दिला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलताना राणे म्हणाले की, “मी गप्पही बसणार नाही. बाळासाहेबांना धोका होता तेव्हा साहेबांनी मला माझ्या लोकांना घेवून बोलवले. साहेब अज्ञातस्थळी असताना मी त्यांच्याबरोबर होतो. मी शेवटी एवढंच म्हणेल की आता बस्स करा. जर संजय राऊत यांनी हे थांबवले नाही, तर मी पण प्रहारमधून सुरू करेल.”असेही राणेंनी म्हंटले.

Leave a Comment