Thursday, October 6, 2022

Buy now

ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेबरोबर घडले भलतेच ! फेशिअल करण्यासाठी हॉटेलवर बोलावलं अन्…

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये ब्युटी पार्लर चालवणाऱ्या एका महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या आरोपीने फेशिअल करण्याच्या नावाखाली पीडित महिलेला एका हॉटेलवर बोलावून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. हा आरोपी नराधम एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेचे अश्लील व्हिडीओ देखील शूट केले. यानंतर या आरोपीने या अश्लील व्हिडीओच्या आधारे आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल करत तिच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणी जळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण ?
गणेश प्रकाश चौधरी असे अटक करण्यात आलेल्या 48 वर्षीय आरोपीचे नाव असून तो जळगाव शहरातील तुळसाई नगर परिसरातील रहिवासी आहे. रामानंदनगर पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. पीडित महिला एक ब्युटीशिअन असून तिचं जळगाव शहरात ब्युटी पार्लर आहे. आरोपी गणेश यानं काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरून पीडितेशी संपर्क साधला होता. यानंतर आरोपीनं ओळख वाढवून पीडितेशी चांगली मैत्री केली होती. यानंतर त्यांच्या प्रत्यक्षात भेटीगाठी देखील वाढल्या. यानंतर आरोपीने या महिलेला जानेवारी महिन्यात डी मार्ट परिसरात बोलावून तिला मोबाईल भेट दिला. तसेच मला माझ्या नातेवाईकाच्या लग्नाला जायचं आहे. माझं फेशिअल करुन दे, असे आरोपीने पीडितेला सांगितले यानंतर पीडितेने लगेच त्याला होकार दिला.

याच गोष्टीचा फायदा घेऊन आरोपी फेशिअल करण्याच्या बहाण्याने पीडितेला भुसावळ रस्त्यावरील एका हॉटेलात घेऊन गेला. याठिकाणी गणेशच्या नावाने आधीच खोली बुक होती. याठिकाणी फेशिअल केल्यानंतर आरोपीने जबरदस्ती करत महिलेशी शारिरीक संबंध ठेवले. यानंतर घाबरलेल्या महिलेने आरोपीशी असलेला संपर्क तोडला. यानंतर आरोपीने अनेकदा तिची माफी मागितल्यावर पीडितेने त्याला माफ केले. त्यानंतर पुन्हा दोघांत बोलणं होऊ लागलं. यानंतर आरोपीने फेब्रुवारी महिन्यांत पुन्हा एकदा पीडितेला त्याच हॉटेलमध्ये घेऊन जात लैंगिक अत्याचार केला. या प्रकारानंतर पीडितेनं आरोपीशी कायमचा संपर्क तोडला. पण आरोपीने दुसऱ्या क्रमांकावरून फोन करून पीडितेला बोलायचं नसेल तर माझा मोबाइल पर दे, असे सांगितले. यानंतर पीडित महिला मोबाइल देण्यासाठी गेली असता, आरोपीने आपल्याकडील अश्लील व्हिडीओ दाखवून पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने 50 हजार रुपये दे, नाहीतर माझ्याशी संबंध ठेव, अशी धमकीसुद्धा दिली. मात्र पीडितेने तसे न केल्याने आरोपीने पीडित महिलेच्या पतीला फेसबुकवर मेसेज करून त्याच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. हा सगळा प्रकार पीडित महिलेच्या पतीला समजताच तिने रामानंद नगर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.