हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Canara Bank : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख Canara Bank ने आपल्या बचत खात्याच्या व्याजदरात सुधारणा केली आहे.
बँकेच्या अधिकृत वेबसाइट वरील माहिती नुसार, 21 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन दर लागू केले जाणार आहेत. यानंतर आता कॅनरा बँक आपल्या बचत खात्यांवर 4% पर्यंत व्याज दर देईल. आता ग्राहकांना निमशहरी, शहरी आणि मेट्रो भागात 1000 रुपये तर ग्रामीण भागात 500 रुपयांमध्ये खाते उघडता येईल. बँकेकडून दरवर्षी 1 फेब्रुवारी, 1 मे, 1 ऑगस्ट आणि 1 नोव्हेंबर रोजी बचत खात्यामध्ये व्याज जमा केले जाते. जे खात्यातील डेली बॅलन्सद्वारे निर्धारित केले जाते.
या लोकांना दिले जाईल 4% व्याज
हे लक्षात घ्या कि, आता Canara Bank कडून 50 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या बॅलन्सवर 2.90% व्याज दर दिला जाईल. तसेच आता कॅनरा बँक 50 लाख रुपये ते 5 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या बॅलन्सवर 2.90%, 5 कोटी ते 10 कोटी रुपयांच्या बॅलन्सवर 2.95% आणि 3.05%, 10 कोटी ते 100 कोटी रुपयांच्या बॅलन्सवर 3.05% व्याज दर दिला जाईल.
आता बँकेकडून 100 कोटी ते 500 कोटी रुपयांच्या बॅलन्सवर 3.10% व्याजदर देत आहे. 500 कोटी ते 1000 कोटी रुपयांच्या बॅलन्सवर 3.40%, 1000 कोटी ते 2000 कोटी रुपयांच्या बॅलन्सवर 3.55%, 2000 कोटी रुपयांच्या बॅलन्सवर 4% व्याजदर मिळत आहे.
हे लक्षात घ्या कि, चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत Canara Bank चा निव्वळ नफा 89% वाढून 2,525 कोटी रुपये झाला आहे. तसेच मागील आर्थिक वर्षाच्या (2021-22) याच कालावधीत बँकेला 1,333 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. चांगल्या तिमाहीनंतर, कॅनरा बँकेचे शेअर्स 4.1% वाढून 260.20 रुपयांवर पोहोचले. त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कॅनरा बँकेचे एकूण उत्पन्नही वाढून 24,932.19 कोटी रुपये झाले आहे, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत 21,331.49 कोटी रुपये होते.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://canarabank.com/User_page.aspx?othlink=9
हे पण वाचा :
DBS Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा
गेल्या 2 वर्षांत ‘या’ Penny Stock ने गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये
Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये पैसे गुंतवून मिळवा अनेक फायदे !!!
IDBI Bank ने लाँच केली स्पेशल FD, नवीन व्याज दर तपासा
IQOO Neo 7 5G स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह लॉन्च, किंमत अन् फीचर्स जाणून घ्या