‘माझी कारकीर्द डरकाळी फोडूनच संपेल’, भास्कर जाधवांचे प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – आज भास्कर जाधव हे चिपळूणमध्ये गेले असता चिपळूण रेल्वे स्टेशनवर हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी भास्कर जाधवांच्या (Bhaskar Jadhav) स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते चिपळूण रेल्वे स्थानकात दाखल झाले होते. यावेळी आपल्या स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची गर्दी पाहून भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) भावूक झाले होते.

प्रवीण दरेकरांनी केली टीका ?
नारायण राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोकणचा विकास होत आहे. त्याला रोखण्याचं काम भास्कर जाधव, वैभव करताहेत, असा आरोप भाजपचे प्रवीण दरेकर यांनी केला होता. तसेच वैभव नाईक यांना समर्थन देण्यासाठी चिपळूणवरून नाचे आले होते, अशी टीकादेखील प्रवीण दरेकर यांनी केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी शरद पवारांचा झेंडा घेतला आणि आता हे कडवट शिवसैनिक झालेत, असा टोलाही दरेकरांनी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना लगावला होता. यावेळी तुम्ही पुन्हा कसं निवडून येता हे आता आम्ही बघतोच, असे आव्हानदेखील प्रवीण दरेकर यांनी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना दिले होते. त्यांच्या या आरोपावर आता भास्कर जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले भास्कर जाधव
राज्यात फिरून आक्रमकपणे भुमिका मांडत असल्यामुळे तरुणांसह वडीलधारी मंडळी शिवसेनेसोबत आहे. सध्याची शिवसेना जुन्या सेनेप्रमाने आक्रमक आहे. आमच्या झेंड्याला कोणी हात लावला तर त्याचे हात तोडण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे. तसेच ‘भास्कर जाधवची (Bhaskar Jadhav) कारकीर्द डरकाळी फोडूनच संपेल’, या शब्दात भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या टीकेला भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी प्रत्युत्तर दिले.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती