पुणे : हॅलो महाराष्ट्र – मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात एका अवघड चढणीच्या वळणावर एक निसान टेरेनो या कारने (car burn) अचानक पेट घेतला. या कारमध्ये एकाच परिवारातील सात महिला होत्या. या महिला वेळीच खाली उतरल्याने त्यांचा जीव वाचला आहे. पनवेल येथील विचुंबे या गावाहून हा परिवार कार्ल्याच्या एकविरा मातेचे दर्शन करण्यासाठी निघाला होता. या कारमध्ये जवळपास सात महिला होत्या. त्यामध्ये एक वयोवृद्ध आजी देखील होत्या.
एकवीरेला चाललेल्या कारने बोरघाटात घेतला पेट, व्हिडिओ आला समोर pic.twitter.com/EarJNgWk4O
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) May 27, 2022
एकविरा मातेच्या दर्शनाला जात असताना अचानक गाडीच्या (car burn) पुढल्या भागातून धूर येतो आहे, असे चालकाच्या लक्षात आल्यावर त्याने त्वरित कार थांबवली. त्याने सर्व महिलांना उतरण्यास सांगितले. या सर्वजणी उतरत असताना गाडीने (car burn) अचानक पेट घेतला. वयोवृध्द महिलेला बाहेर काढताना सर्वांचाच जीव कंठाशी आला होता. पण म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नाही या म्हणीनुसार साऱ्या महिला सुखरूप बाहेर पडल्या.
या घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा, खोपोली अग्निशमन दल हे सर्व तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पाणी आणि फोमच्या सहाय्याने गाडीला लागलेली आग विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत या आगीमध्ये संपूर्ण कार जाळून खाक झाली होती. या घटनेमुळे सुमारे दीड तास घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र हि आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र समजू शकलेले नाही.
हे पण वाचा :
आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या
KKR चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित IPL मधून बाहेर
NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक
एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल