धक्कादायक! कारच्या शर्यतीमुळे एकुलत्या एका मुलाला गमवावा लागला जीव, काय घडले नेमके?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोन चारचाकींमध्ये लागलेल्या शर्यतीत एका कारने दिलेल्या धडकेत (accident) विक्रांत संतोष मिश्रा या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास शहरातील मेहरुण तलावाकाठी (accident) घडली आहे. हा अपघात (accident) इतका भयंकर होता की त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत कार चालवणारा आरोपी मुलगासुद्धा अल्पवयीन होता.

काय आहे प्रकरण ?
रविवारी सुट्टी असल्यामुळे विक्रांत मिश्रा हा चुलत भाऊ सुनील जितेंद्र मिश्रासोबत सायकलीने मेहरुण तलावाकडे फिरायला गेला होता. याचठिकाणी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा कार घेऊन शिकण्यासाठी मेहरुण तलावाकाठी गेला होता. हा अल्पवयीन मुलगा जळगाव शहरातील मास्टर कॉलनीतील रहिवासी आहे. तो याठिकाणी आल्यावर याठिकाणी त्याच्या मित्राचीही कार होती. यावेळी दोन्ही मुलांनी कारची शर्यत लावली. त्यानंतर एमएच 19 बीयू 6006 या कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रांतला जोरदार धडक (accident) दिली.

यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत (accident) घोषित केले. आपल्या एकुलत्या एक तरुण मुलाचा मृतदेह पाहून विक्रांतच्या आईवडिलांनी एकच हंबरडा फोडला. मृत विक्रांत हा जळगाव शहरातील मेहरुण जलतरण तलावसमोरील विद्या इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होता. विक्रांतचे वडील संतोष गिरीजाशंकर मिश्रा हे जळगाव साऊंड असोसिएशन संघटनेचे सहसचिव म्हणून काम करतात. तर त्याची आई रिचा गृहिणी आहे. आपल्या मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे दोघांनाही मोठा धक्का बसला आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???

सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!