हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Car Safety Features :सामान्यतः नवीन कार खरेदी करताना लोकं कारचा मायलेज आणि त्यामधील सुविधांना प्राधान्य देतात. मात्र हे लक्षात घ्या की बहुतेक लोकांकडून कारच्या सेफ्टी फीचर्सकडे दुर्लक्ष केले जाते. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये दिलेले फिचर्स अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यासोबतच ड्रायव्हर आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कारमध्ये योग्य सेफ्टी फीचर्स नसेल तर अशा वाहनातून प्रवास करण्याचा धोका वाढतो. कार बनवणाऱ्या कंपन्यां कडून एंट्री लेव्हल कारमध्ये कमीत कमी सेफ्टी फीचर्स दिले जातात.
मात्र, आता कारमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सरकारकडून अनेक कडक नियम तयार केले गेले आहेत ज्यांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र असे असूनही एंट्री लेव्हल कारमध्ये अनेक सेफ्टी फीचर्सशी तडजोड केली जात आहे. जर आपणही नवीन कार खरेदी करणार असाल तर त्यामध्ये कोणते महत्त्वाचे सेफ्टी फीचर्स तपासले पाहिजेत हे जाणून घेउयात … Car Safety Features
स्पीड सेन्सिंग डोअर लॉक
हे देखील एक अत्यंत महत्त्वाचे सेफ्टी फीचर्स मानले जाते. विशेषतः ज्यांच्याकडे लहान मुले आहेत त्यांच्यासाठी तर हे खूपच महत्वाचे आहे. स्पीड सेन्सिंग डोअर लॉक हे गाडीचे दरवाजे ठराविक वेगावर पोहोचताच आपोआप लॉक होतात. हे देण्यामागील कारण असे कि बऱ्याचदा असे घडते की ड्रायव्हर कारचे दरवाजे लॉक करण्यास विसरतो. त्यामुळे चालत्या गाडीदरम्यान दरवाजे उघडण्याचा धोका असतो. अशामुळे जर आपण लहान मुलांसह कारमधून प्रवास करत असाल तर हे फीचर्स खूप महत्वाचे आहे. Car Safety Features
स्पीड सेन्सिंग डोअर अनलॉक
स्पीड सेन्सिंग डोअर अनलॉक फीचर्सचा उपयोग कारचा अपघात झाल्यावर होतो. या सिस्टीममुळे जर आपली कार धडकली गेली तर दरवाजे आपोआप उघडले जातात. त्यामुळे आत बसलेल्या प्रवाशांना शक्य तितक्या लवकर गाडीतून बाहेर पडता येते. अनेकवेळा असे घडते की, अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर किंवा प्रवासी गाडीचा लॉक उघडू शकत नाही आणि ज्यामुळे मदतीला आलेल्या लोकांना त्यांना लवकर बाहेर काढता येत नाही. विशेषतः जेव्हा कारमध्ये आग लागते तेव्हा असे घडते. Car Safety Features
ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज
एअरबॅग्जद्वारे अपघातादरम्यान कारचा ड्रायव्हर आणि प्रवाशांना गंभीर दुखापत होण्यापासून वाचवले जाते. जेव्हा एखादे वाहन क्रॅश होते, तेव्हा कारमध्ये बसवलेल्या एअरबॅग उघडतात आणि समोरून प्रवासी आणि चालकाचे शरीर झाकतात. त्यामुळेच जर आपण कार घेणार असाल तर अशी कार घ्या ज्यामध्ये ड्युअल एअर फ्रंट एअरबॅग्ज असतील.
ABS-EBD ब्रेकिंग सिस्टीम
अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टीम म्हणजेच ABS हे अचानक ब्रेक लावल्यानंतर गाडीची चाके लॉक होण्यापासून रोखते. त्यामुळे कारवरील ताबा सुटून ती उलटण्यापासून वाचते. सध्या हे फीचर्स फक्त महागड्या कारमध्येच दिले जाते. इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन सिस्टीम (EBS) देखील ABS दिले जातात. याचे मुख्य काम हे ब्रेक लावताना सर्व चारही चाकांवर ब्रेकिंग प्रेशरचे समान वितरण करणे आहे. जर आपण महागडी कार खरेदी करणार असाल तर त्यामध्ये ABS-EBD ब्रेकिंग सिस्टीम बसवली आहे की नाही हे नक्कीच पहा.Car Safety Features
रिव्हर्स पार्किंग सेन्सर
कार पार्क करताना रिव्हर्स पार्किंग सेन्सर खूप कामी येतो. याद्वारे कारच्या मागे एखादी व्यक्ती उभी असली तरी रिव्हर्स पार्किंग सेन्सर ड्रायव्हरला अलार्मद्वारे अलर्ट करतो. याद्वारे आपल्या कारची सुरक्षा आणखी वाढेल. Car Safety Features
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.consumerreports.org/cro/2012/04/guide-to-safety-features/index.htm
हे पण वाचा :
Business Idea : ‘या’ तीन प्रकारच्या झाडांच्या पानांची लागवड करून मिळवा भरपूर पैसे !!!
Multibagger Stock : एका वर्षात ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 5 पट नफा !!!
SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर !!! आता FD वरील व्याजदरात होणार वाढ
HDFC कडून व्याजदरात वाढ !!! आता होम लोन महागणार, नवे दर पहा
PM Kisan : आता फक्त ‘ही’ अट पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच दिला जाणार 12 वा हप्ता