व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

HDFC कडून व्याजदरात वाढ !!! आता होम लोन महागणार, नवे दर पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HDFC : भारतातील सर्वात मोठी हाऊसिंग फायनान्स कंपनी असलेल्या HDFC कडून आपल्या ग्राहकांना धक्का देण्यात आला आहे. गुरुवारी एचडीएफसी ने आपल्या हाउसिंग लोनवरील रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) मध्ये 50 बेस पॉइंट्स किंवा 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. इथे हे लक्षात घ्या कि, RPLR वर एडजस्टेबल रेट होम लोन (ARHL) ला बेंचमार्क केले जाते. 10 जून 2022 पासून हे नवीन दर लागू केले आहेत.

HDFC home loan gets cheaper, interest rate cut by 15 bps - BusinessToday

EMI मध्ये होणार वाढ

RBI कडून बुधवारी रेपो दरात 50 बेस पॉईंटची वाढ करण्यात आली, ज्यानंतर एचडीएफसी ने हे पाऊल उचलले आहे. यामुळे ग्राहकांच्या EMI मध्ये वाढ होईल.

7 जून रोजीही बँकेने कर्जावरील व्याजदरात केली होती वाढ

HDFC बँकेने मंगळवारी म्हणजेच 7 जून 2022 रोजी कर्जदरात 0.35 टक्क्यांनी वाढ केली आहे. RBI च्या चलनविषयक आढावा बैठकीच्या निकालापूर्वीच एचडीएफसी बँकेने ही वाढ केली आहे. बँकेकडून गेल्या दोन महिन्यात व्याजदरात दुसऱ्यांदा वाढ केली गेली. HDFC बँकेने आतापर्यन्त दोन वेळा कर्जावरील व्याजदरात 0.60 टक्क्यांनी वाढ केली होती.

Union Bank slashes home loan interest rate to all-time low of 6.40%, check  SBI, LIC HFL's offerings | Personal Finance News | Zee News

RBI कडून महीन्याभरात रेपो दरात दोनदा वाढ करण्यात आली

8 जून 2022 रोजी, RBI चे गव्हर्नर असलेल्या शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 50 बेस पॉईंट्स किंवा 0.50 टक्के वाढ करण्यात आल्याची घोषणा केली. त्यानंतर रेपो दरात 4.40 टक्क्यांवरून 4.90 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. या आधी 4 मे 2022 रोजी देखील RBI कडून रेपो दर 4.00 टक्क्यांवरून 4.40 टक्क्यांनी करण्यात आला होता.

How to take advantage of record-low home loan rates- The New Indian Express

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfc.com/housing-loans/home-loan-interest-rates

हे पण वाचा :

PM Kisan : आता फक्त ‘ही’ अट पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच दिला जाणार 12 वा हप्ता

Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट !!!

Gold Price Today : सोन्या- चांदीमध्ये आज घसरण !!! नवीन दर पहा

ICICI Bank च्या कर्जावरील व्याज दरात वाढ , EMI देखील महागले

आता सहकारी बँकांकडून घेता येणार 1.40 कोटी रुपयांपर्यंतचे Home Loan, RBI ने वाढवली मर्यादा