फलटण- बारामती मार्गावर पूरात कार वाहून गेली : बापलेकीचा गुदमरून मृत्यू

Car Washed Flood
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फटलण | फलटण शहर व तालुक्याला काल मध्यरात्री मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. फलटण- बारामती या मार्गावर सोमंथळी गावाच्या नजीक ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात कार वाहून गेली. या कारमध्ये असलेल्या बापलेकीचा गाडीत गुदमरून मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेत छगन उत्तम मदने (वय- 38) व त्यांची मुलगी प्रांजल छगन मध्ये (वय- 12, रा. वारुगड, ता. माण) या बापलेकीचा मृत्यू झाला आहे.

फलटण शहर व तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. काल रात्री आठ नंतर पावसाने रौद्ररूप धारण केले, यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. फलटण शहरातून वाहत जाणाऱ्या बाणगंगा नदीला मोठा पूर आला. त्यामुळे नदीकाठच्या अनेक घरात पाणी घुसल्याने या लोकांना रात्रीच्या वेळेस सुरक्षित स्थळी हलवावे लागले. शहरातील अनेक पेठात तसेच गल्लीतल नागरिकांच्या घरात पाणी घुसले.

अनेकांचे संसार उपयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. घरांचे पत्रे वाहून गेले असून काही जणांच्या घरांची पडझड झाली आहे. ग्रामीण भागात पण अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झाले असून शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. रेल्वे लाईन जवळ मळीचा ओढा या ठिकाणी एक कार ओढ्याच्या पाण्यात वाहून जाऊन दुर्घटना घडली.