सावधान! NPCI ने UPI युझर्ससाठी जारी केला Alert, यावेळी देऊ नका पेमेंट नाहीतर …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना काळात, UPI आणि डिजिटल पेमेंटचा वापर वेगाने वाढला आहे. जर आपण UPI द्वारे पेमेंट करत असाल तर पुढील काही दिवसात रात्रीच्या आपल्याला काही समस्या येऊ शकतात. खरं तर, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) एक अलर्ट जारी केला आहे आणि युझर्सला सांगितले आहे की, आज मध्यरात्रीपासूनच UPI पेमेंटमध्ये अडचण येऊ शकते. NPCI ने ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. NPCI ने याबाबत म्हटले आहे की, लोकांनी रात्री 1 ते 3 दरम्यान यूपीआय पेमेंट करू नये.

NPCI ने ट्वीट करून ही माहिती दिली
NPCI ने एक ट्वीट करुन माहिती दिली आहे की, आपला पेमेंट एक्सपेरिअन्स सुधारण्यासाठी रात्री 1 ते 3 या वेळेत या सिस्टिम अपग्रेड केली जात आहे. अशा परिस्थितीत आपल्याला पेमेंट करण्यात अडचण येऊ शकते. एनपीसीआय म्हणते की, हा त्रास टाळण्यासाठी युझर्सनी दिवसभरातच आवश्यक तो कामं पूर्ण केली पाहिजे.

वाढत आहे बँकिंग फ्रॉडची प्रकरणे
गेल्या काही महिन्यांत बँकिंग फ्रॉडचे प्रमाण वाढले आहे. डिजिटल बँकिंग आणि ऑनलाइन व्यवहार करणार्‍या लोकांसाठी सर्वात मोठे लक्ष्य केले जात आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या बँक खात्याबद्दल सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे. वाढत्या फसवणूकीच्या पार्श्वभूमीवर बँक, आरबीआय, एनपीसीआय आणि सरकार वेळोवेळी याविषयी सामान्य लोकांना सतर्क करत राहते. अशा परिस्थितीत, यूपीआयच्या पेमेंट्सशी संबंधित फसवणूकीपासून आपले पैसे कसे संरक्षित करावेत हे आपल्यासाठी फार महत्वाचे आहे. कारण आजकाल सायबर गुन्हेगार खूपच लबाडीचे बनले आहेत.

याप्रकारे फसवणूक टाळा
कोणतीही सरकारी संस्था, बँका आणि इतर वित्तीय संस्था मेसेजद्वारे (SMS) कोणाकडूनही आर्थिक माहिती मागवत नाहीत. परंतु एखाद्याने जर मेसेजद्वारे आपल्या खात्याशी संबंधित कोणतीही माहिती विचारली तर आपण बँक किंवा ई-वॉलेट फर्मला याची माहिती देऊ शकता.

याशिवाय पोलिस किंवा सायबर क्राइम सेलकडेही तक्रार केली जाऊ शकते. कोणतेही असत्यापित अ‍ॅप्स डाउनलोड करू नयेत किंवा त्यांच्या फोनवरील मेसेजेसला रिप्लाय देऊ नयेत आणि कोणत्याही अनधिकृत लिंकवर क्लिक करू नये याची खबरदारी ग्राहकांनी घ्यावी.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment