दिशा सालीयन प्रकरणी राणेंवर गुन्हा दाखल; ते आरोप भोवणार??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिशा सालीयन हिच्या बदनामी प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालीयन प्रकरणी केलेल्या वेगवेगळ्या आरोपांनंतर सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितली होती. त्यानंतर मालवणी पोलीस ठाण्यात राणेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाली आहे. ती गरोदरही होती, असा दावा नारायण राणे यांनी केला होता. त्यावर सालियन कुटुंबीयांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितली होती. त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांकडून दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा अहवाल मागितला होता.

महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारीची आम्ही गंभीर दखल घेतलेली आहे. पत्रात ज्यांची नावे आहेत त्यांच्यावर कारवाई होईल, असं महिला आयोगाच्या सदस्या गौरी छाब्रिया म्हणाल्या. त्यामुळे नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतल्याने घडामोडींना वेग आला आहे.