हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income tax : इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय सारख्या मोठ्या तपास यंत्रणांकडून अनेकदा छापे टाकले जातात. ज्यामध्ये लोकांच्या घरातून सापडलेली कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त केल्याच्या बातम्या आपण बऱ्याच वेळा ऐकलेल्या आहेत. नुकतेच पश्चिम बंगालमध्ये केलेल्या एका मोठ्या कारवाईत ईडीने अर्पिता मुखर्जी नावाच्या एका महिलेच्या फ्लॅटमधून सुमारे 50 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.
अशा परिस्थितीत एक असा प्रश्न उदभवतो कि, एखाद्या सामान्य माणसाला आपल्या घरात किती रोख रक्कम ठेवता येऊ शकेल ??? चला तर मग याबाबत सविस्तरपणे जाणून घेउयात … Income tax
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नियमांनुसार, आपल्याला घरात कितीही रोकड ठेवता येते, मात्र जर ती तपास यंत्रणेने पकडली तर आपल्याला त्याच्या स्रोतांबाबतची माहिती सांगावी लागेल. जर आपण कायदेशीररित्या ते पैसे कमावले असतील आणि आपल्याकडे त्यासंबंधीची संपूर्ण कागदपत्रे असतील किंवा इन्कम टॅक्स रिटर्न (Income tax) भरला असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र जर आपल्याला त्याविषयीच्या स्रोतांबाबतची माहिती देता आली नाही तर एजन्सीकडून कारवाई केली जाईल. Income tax
घरात रोख रक्कम ठेवण्यासाठीच काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या … (Income tax)
घरात ठेवलेल्या पैशांचा स्रोत उघड न केल्यास 137 टक्क्यांपर्यंत दंड होऊ शकेल.
एका आर्थिक वर्षात 20 लाखांपेक्षा जास्त रोख रकमेचे ट्रान्सझॅक्शन केल्यास दंड आकारला जाऊ शकेल.
CBDT नुसार, एकावेळी 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोकड जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी पॅन नंबर द्यावा लागेल.
जर एखाद्या व्यक्तीने एका वर्षात 20 लाख रुपयांची रोख रक्कम जमा केल्यास पॅन आणि आधारचा डिटेल्स द्यावे लागतील.
पॅन आणि आधार डिटेल्स न दिल्यास 20 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकेल.
2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेद्वारे खरेदी करता येणार नाही.
2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेद्वारे खरेदीसाठी, पॅन आणि आधार कार्डची कॉपी द्यावी लागेल.
30 लाख रुपयांच्या वरच्या रोख मालमत्तेच्या खरेदी-विक्री करण्याने एखादी व्यक्ती तपास यंत्रणेच्या रडारवर येऊ शकेल.
क्रेडिट-डेबिट कार्डच्या पेमेंट दरम्यान, एखाद्या व्यक्तीने एकाच वेळी एक लाख रुपयांपेक्षा जास्त पेमेंट केले तर त्याची चौकशी होऊ शकेल.
एका दिवसात नातेवाइकांकडून 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख घेता येणार नाही. हे बँकेमार्फत करावे लागेल.
रोख देणगीची मर्यादा 2,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
कोणतीही व्यक्ती इतर कोणत्याही व्यक्तीकडून 20 हजारांपेक्षा जास्त रोख रकमेचे कर्ज घेऊ शकत नाही.
बँकेतून 2 कोटींहून जास्त रक्कम काढल्यास TDS आकारला जाईल. Income tax
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://enforcementdirectorate.gov.in/
हे पण वाचा :
PM Kisan मध्ये काही शेतकऱ्यांना पुढील हप्त्यात 2 हजारांऐवजी मिळतील 4 हजार रुपये !!!
ITR refund संबंधित महत्वाचे 5 नियम समजून घ्या !!!
Multibagger Stock : या 5 शेअर्सनी एका वर्षात दिला चार पट रिटर्न !!!
Sukanya samriddhi yojana च्या व्याजाशी संबंधित ‘हा’ नियम जाणून घ्या !!!