मोबाईल, DTH आणि बिल पेमेंटवर ‘ही’ बँक देत आहे कॅशबॅक, जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । अॅक्सिस बँकेने (Axis Bank) ऑनलाइन पेमेंट अॅप गुगल पे (Google Pay) आणि व्हिसा (Visa) यांच्याशी मिळून एक नवीन क्रेडिट कार्ड सुरू केले आहे. ऐस क्रेडिट कार्ड (ACE Credit Card) द्वारे पैसे देऊन युजर्सना खास फायदा होईल. या कार्डच्या माध्यमातून युजर्स मोबाइल रिचार्ज (Mobile Recharge) आणि बिल पेमेंट (Bill Payments) वर 5 टक्के कॅशबॅक मिळवू शकतात. विशेष म्हणजे या कॅशबॅकवर कोणतेही कॅपिंग नाही.

axisbank.com वर दिलेल्या माहितीनुसार, या कार्डमधून पेमेंट केल्यास युजर्सना 2% ते 5% कॅशबॅक मिळेल.
1. गूगल पेवर मोबाइल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, बिल पेमेंट (इंटरनेट, वीज, गॅस इत्यादी) करून अनलिमिटेड 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध असेल.
2. स्विगी, झोमाटो आणि ओला वरही पेमेंट देऊन तुम्ही 4 टक्के कॅशबॅक मिळवू शकता.
3. इतर ट्रान्सझॅक्शनवरही अनलिमिटेड 2 टक्के कॅशबॅक आहे.

याशिवाय क्रेडिट कार्डवरून ग्रोफर्स आणि बिग बास्केट या उत्पादकांना पेमेंट दिल्यास 5 टक्के युजर्सना कॅशबॅक मिळतील. मात्र, ही ऑफर फक्त 31 डिसेंबरपर्यंतच उपलब्ध आहे.

या ट्रान्सझॅक्शनवर कॅशबॅक उपलब्ध होणार नाही
1. इंधन खर्च
2. ईएमआय ट्रान्सझॅक्शन
3. रोख अॅडव्हान्स
4. वॉलेट लोड इ.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment