हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG : सध्याच्या महागाईच्या काळात गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या आहेत. मात्र केंद्र सरकारने याबाबत दिलासा देताना या महिन्यात गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवलेल्या नाहीत. हे लक्षात घ्या कि, आपल्याला ऑइल कंपनीच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून आणि ऑनलाईन देखील एलपीजी सिलेंडर देखील बुक करता येतील. मात्र जर आपण पेटीएम वरून सिलेंडर बुक केला तर यामध्ये आपलाच मोठा फायदा होऊ शकेल. कारण सध्या पेटीएमवर LPG गॅसच्या बुकिंगवर अनेक चांगल्या ऑफर्स दिल्या जात आहेत. ज्याअंतर्गत, LPG बुकिंगवर ₹ 1000 पर्यंतचा कॅशबॅक मिळू शकेल.
सध्या पेटीएमवर गॅस सिलेंडरच्या बुकिंगसाठी 4 कॅशबॅक ऑफर सुरू आहेत. यामध्ये ग्राहकांना 5 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. यामधील पहिल्या कॅशबॅक ऑफरचा प्रोमोकोड GAS1000 आहे. याचा वापर करून ग्राहकांना 5 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकेल. त्याचप्रमाणे, प्रोमोकोड FREEGAS वाल्या ऑफरमध्ये गॅस सिलेंडर बुक करणाऱ्या प्रत्येक 500 व्या ग्राहकाला 1000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. तसेच पेटीएम AU क्रेडिट कार्डद्वारे सिलेंडरसाठी पैसे भरल्यास 50 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. या ऑफरचा प्रोमोकोड AUCC50 आहे. तसेच येस बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेटीएमवर गॅस सिलिंडरचे पैसे भरल्यास 30 रुपयांची सूट देखील उपलब्ध आहे. यासाठी बुकिंग करताना GASYESCC हा प्रोमोकोड टाकावा लागेल.
Paytm द्वारे अशा प्रकारे बुक करा LPG सिलेंडर
सर्वांत आधी Paytm App उघडा.
यानंतर थोडे खाली स्क्रोल केल्यावर Book gas Cylinder चा पर्याय मिळेल. त्यावर टॅप करा.
त्यानंतर गॅस प्रोव्हायडर निवडा. यामध्ये भारतगॅस, एचपी गॅस, इंडेन यांचा समावेश आहे.
यानंतर एलपीजी आयडी किंवा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकावा लागेल.
त्यानंतर खाली दिलेल्या Proceed वर टॅप करा.
आता जे पेज उघडेल त्याच्या तळाशी Apply Promocode लिहिलेले असेल त्यावर क्लिक करा.
येथे ज्या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे त्याचा प्रोमो कोड टाकावा लागेल.
प्रोमो कोड टाकल्यानंतर पेमेंट करावे लागेल. तसेच पेमेंट केल्यानंतर कॅशबॅक मिळेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://paytm.com/offer/
हे पण वाचा :
Union Bank of India कडून ग्राहकांना धक्का, होमलोनवरील EMI वाढणार
Train Cancelled : रेल्वेकडून आज 271 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Stock Tips : आगामी काळात ‘हे’ 5 स्टॉक देऊ शकतील मोठा रिटर्न, आपल्या प्रोफोलिओमध्ये आजच करा समावेश
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमती वधारल्या, आजचे दर तपासा
Indian Overseas Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, FD वर मिळणार जास्त व्याज