आपच्या आमदाराला पक्ष कार्यकर्त्यांकडूनच मारहाण, Video आला समोर

gulab singh yadav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या सोशल मीडियावर आपच्या एका आमदाराचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या दिल्ली विभागाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. आपचे आमदार गुलाब सिंह यादव (gulab singh yadav) यांचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओमध्ये आपचे आमदार गुलाब सिंह यादव (gulab singh yadav) यांना त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते मारहाण करताना दिसत आहेत. राजधानी दिल्लीमधील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
यामध्ये दिसत आहे कि, आपचे आमदार गुलाब सिंह यादव (gulab singh yadav) हे कार्यकर्त्यांशी वाद घालताना दिसत आहेत. या वादाचं रुपांतर हाणामारीत होतं आणि कार्यकर्ते आमदाराला धक्काबुक्की करुन कार्यालयाबाहेर काढतात. यानंतर हे कार्यकर्ते आमदाराचा पाठलाग करतात. यानंतर आमदार गुलाब सिंह यादव हे आपला जीव वाचवण्यासाठी पोलीस स्थानकामध्ये धाव घेतात.

भाजपाने ट्विटरवरुन हा व्हिडीओ शेअर करताना सिंह यांनी पैसे घेऊन दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तिकीटं वाटल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे. केजरीवालजी अशाचप्रकारे आपच्या सर्व भ्रष्ट आमदारांची संख्या पुढे येईल,” असेदेखील दिल्ली भाजपकडून ट्विट करण्यात आले आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सम्बीत पात्रा, तेजेंदर सिंग बग्गा आणि इतर नेत्यांनी देखील हा व्हिडिओ आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!