तुम्हालाही जुलाबाचा त्रास? पहा कारणे आणि त्यावरील घरगुती उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दूषित आहार, पोटातील इन्स्पेक्शन, दूषित पाणी, मसालेदार पदार्थ यामुळे अनेकांना जुलाब (diarrhea) होतो. जास्त प्रमाणामध्ये जुलाब झाल्यामुळे व्यक्ती हा कमजोर होतो. तसेच वारंवार शौचालयाला गेल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत आणि डिहायड्रेशनचा त्रास होतो त्यामुळे लवकरात लवकर जुलाबावर मात करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला जुलाब होण्याची कारणे आणि त्यावर मात करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

जुलाब होण्याची कारणे-

दूषित आहार (Contaminated Food)
दूषित पाणी
मसालेदार पदार्थांचे सेवन
व्हायरल इन्फेक्शन
आतड्यांसंबंधी रोग

जुलाब होण्याची लक्षणे – Symptoms of diarrhea

उलट्या होणे
वारंवार संडासला येणे
मळमळ होणे
अशक्तपणा
पोटात दुखणे
ताप येणे

जुलाबावर घरगुती उपाय- Home Remedies for Diarrhea

जुलाब झाल्यास आल्याचा रस, लिंबाचा रस आणि मिरी पावडर एकत्रित करून प्या. यामुळे जुलाब कमी होण्यास मदत होते.

जुलाबावर नारळाचे पाणी सुद्धा उपयुक्त असते. जुलाबामुळे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होते. नारळपाणी ग्लुकोजची कमी भरून काढते त्यामुळे आपल्याला जुलाब होत असेल तर आपण दिवसातून दोन ते तीन वेळा नारळाचे पाणी प्यायला हवे.

जुलाबावर मात करण्यासाठी ताक प्यावे , मात्र यामध्ये हिंग व चिमटीभर मीठ घालावे.

जुलाबाबरोबर उलट्यासुद्धा होत असल्यास अर्धा चमचा जियाची पावडर व चिमटीभर मीठ टाकून लिंबाचा रस काढावा. आणि दिवसातून ३ वेळा प्यावा.

जुलाबावर केळी सुद्धा रामबाण उपाय ठरू शकतो. यासाठी पिकलेले अथवा कच्चे केळ खावे त्यामुळे आपले जुलाब थांबू शकतात.