मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) जग सोडून 6 महिन्यांपेक्षाही अधिक काळ झाला आहे. सीबीआयकडून (Central Bureau of Investigation) त्याच्या केसची चौकशी केली जात आहे. मात्र, सीबीआयने आतापर्यंत कोणताही अहवाल सादर केला नसल्यामुळे आता सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अगोदर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि आता मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Paramvir Singh) यांनी सीबीआयच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत. (Bollywood actor Sushant Singh Rajput case)
सुशांतसिंग राजपूत प्रकरणाबद्दल बोलताना आयुक्त परमबीर सिंह म्हणाले की, लवकरच सीबीआय सुशांत सिंह राजपूतच्या केसचा अहवाल सादर करेल आणि त्यांचा आणि आमचा अहवाल एक सारखाच असेल अगोदरच सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात केलेली चौकशी योग्य आहे. मात्र, काही लोकांनी मुंबई पोलिसांचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेवटी आमचा तपासच जिंकणार आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उभे केले होते.
4 जून रोजी सुशांतसिंग राजपूत त्याच्या मुंबईच्या घरी मृत अवस्थेत आढळला होता. त्यानंतर आतापर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रिया चक्रवर्तीला सुशांतसिंग राजपूत मृत्यू ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. रिया जवळपास 1 महिना तुरूंगात होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने रियाला जामीन मंजूर केला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’