सीबीआय कडून अनिल देशमुखांविरोधात एफआयआर दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा आरोप केल्यानंतर अडचणीत आलेले अनिल देशमुख यांच्यावर आता सीबीआय कडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून देशमुखांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंग यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सीबीआयने महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. सीबीआय विविध ठिकाणी शोध घेत आहे अस ट्विट एएनआय ने केलं आहे.

100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी  अनिल देशमुख यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. आणि आता सीबीआयने थेट एफआरआय दाखल केला. त्यामुळे देशमुखांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान, सीबीआयने गुन्हा दाखल केल्याने देशमुख यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोर्टात जाऊन अंतरिम जामीन मिळवण्याचा पर्याय देशमुखांकडे असून ते कोर्टात जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment