अनिल देशमुखांचा पाय आणखी खोलात; नागपूरच्या घरी सीबीआयची छापेमारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. देशमुख यांच्या नागपुरातील घरी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचं ( सीबीआय) पथक दाखल झालं आहे. सीबीआयचे ७ अधिकारी देशमुखांच्या घरी पोहचले असून देशमुख यांचा मुलगा आणि सुनेला अटक होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख हे गायब आहेत. आज सकाळी ७ वाजता सीबीआयचे पथक दाखल झाले आहेत. सीबीआयचे एकूण ५ ते ६ अधिकारी देशमुख यांच्या घरी पोहचले आहेत. मात्र, अनिल देशमुख त्यांच्या नागपुरातील घरीही नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून ते गायब आहेत.

अनिल देशमुख यांच्याविरोधात मनी लाँडरिंग आणि 100 कोटी वसुली प्रकरणात ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. मागील आठवड्यात मुंबई सत्र न्यायालयाने अनिल देशमुखांना नोटीस बजावून 16 नोव्हेंबरपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

You might also like