नुपुर शर्माच्या समर्थनात स्टेटस ठेवल्यानं तरुणाला जमावाकडून बेदम मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपुर शर्मा (Nupur Sharma) यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्य, देश, विदेशात वातावरण मोठ्या प्रमाणात पेटले. नुपुर शर्मा (Nupur Sharma) यांच्या वक्तव्यानंतर मुस्लिम संघटना अधिक आक्रमक झाल्या. देशातील विविध भागात, महाराष्ट्रातही रस्त्यावर उतरुन नुपुर शर्मा (Nupur Sharma) यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्यांच्या या वक्तव्याने बिहार, उत्तर प्रदेशात हिंसा भडकली.महाराष्ट्रात अजून असा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र सोलापुरात आज एका तरुणाला नुपुर शर्माच्या समर्थनात स्टेटस ठेवल्यामुळे बेदम मारहाण करण्यात आली. हि संपूर्ण मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

https://twitter.com/RajaramUbhe/status/1537444872877383680

नेमकं काय घडलं?
सोलापूरमध्ये नुपूर शर्माच्या (Nupur Sharma) समर्थनात स्टेटस ठेवलं होतं. त्यामुळे नाराज झालेल्या त्याच्या मुस्लिम मित्रांनी त्याला फोनवरुन सांगितलं. त्यानंतर त्याने माफीही मागितली. त्यावेळी त्याच्या मुस्लिम मित्रांनी त्याला बोलावून घेतलं. तिथे एकूण चार जण होते. तिथेही पिडीत तरुणाने माफी मागितली आणि पुन्हा असं होणार नसल्याचं सांगितले. यानंतर पीडित तरुण आपल्या काकाच्या घरी लपून बसला होता. त्यानंतर त्याच्या मुस्लिम मित्रांनी त्याचे फोटो व्हायरल केले. तिथे सापडेल तिथून संपर्क करा याला फोडून काढायचं आहे, असे मेसेज पसरवण्यात आले. यानंतर पीडित तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे पोलिसांनी समोरच्या लोकांना बोलावून हा विषय मिटवला. त्या ठिकाणीसुद्धा पीडित तरुणाने माफी मागितली.

मुख्य आरोपी अद्याप मोकाट
पोलिसांनी हा विषय मिटवल्यानंतर पीडित तरुण घरी गेला. त्यानंतर पीडित तरुणाच्या ओळखीचे ४ जण आणि तीन रिक्षात किमान 15 जण आले. त्यांनी त्याला घरातून बाहेर ओढून नेलं. जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत त्याला मारत नेले. त्यांच्या हातात फायटर होते. त्यांनी पीडित तरुणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर पीडित तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी फक्त दोघा-तिघांनाच अटक केली आहे. जो मुख्य आरोपी आहे तो अजूनही मोकळा फिरत आहे. त्याला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी पीडित तरुणाने केली आहे.

हे पण वाचा :
आता भाजपचे पुढचे मिशन लोकसभा; देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषदेद्वारे माहिती

देहूतील कार्यक्रमाबाबत अजितदादा प्रथमच बोलले; म्हणाले की मला…

Multibagger Stock : दीर्घकालावधीत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!

अजित पवारांनी स्वीकारले देवेंद्र फडणवीसांचे आव्हान ; म्हणाले कि…

अखेर केतकी चितळेला जामीन मंजूर

Leave a Comment