व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अजित पवारांनी स्वीकारले देवेंद्र फडणवीसांचे आव्हान ; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे किंगमेकर ठरले आहेत. निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिले आहे. त्यांचे ते आव्हान हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारले आहे. “राज्यसभेत आम्ही काठावर पास झालो. पराभवानंतर माणूस शिकतो. विधान परिषदेच्या निकालानंतर, कुणाकड़े कौशल्य आहे स्पष्ट होईल, असे म्हणत अजित पवार यांनी फडणवीसांचे नाव न घेता इशारा दिला आहे.

बारामतीमधील सायन्स पार्कचा उद्घाटनाचा कार्यक्रम प्रसिद्ध उद्योगती गौतम अदानी याच्या हस्ते खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी
उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, निवडणुकीत जो जिकंतो त्याच्याकडे कौशल्य असते असे म्हंटले जाते. येणाऱ्या विधानपरिषद निवडणूक निकालानंतर हे कौशल्य कोणाकडे आहे आणि कोणाकडे काय आहे, हे कळेल. आमही आता मागे हटणार नाही, असेही यावेळी पवार यांनी म्हंटले.

विधान परीक्षा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच महाविकास आघाडीची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यात निवडणूक व्युहरचने संबंधी चर्चा केली जाणार आहे. यापूर्वीही प्रमुख नेत्यांची बैठक झाली आहे. आपापले उमेदवार निवडून आणणे हे त्या पक्षाची जबाबदारी आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले.