Tuesday, January 31, 2023

पुण्यात 500 कोटींच्या प्रकल्पाला केंद्राकडून मंजूरी; 5 हजार तरुणांना रोजगार मिळणार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात येणार अनेक प्रकल्प अन्य राज्यात हलवण्यात आल्याने राजकीय वातावरण तापलं होत. विरोधकांकडून शिंदे – फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्यात येत होती. मात्र आता महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅनुफॅक्चरिंग क्लस्टरच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. यामुळे 5 हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मी माननीय पंतप्रधानांचा अत्यंत ऋणी आहे. भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक्स विषयक राष्ट्रीय धोरणांतर्गत पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरला मान्यता दिली आहे. यामुळे महाराष्ट्रात मजबूत इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम तयार होईल. या EMC मध्ये ₹2000 कोटी गुंतवणूक करणे आणि 5000 रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. रांजणगाव येथील हे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर 297.11 एकरमध्ये पसरले जाईल आणि यासाठी ₹492.85 कोटी खर्च केले जातील. (₹२०७.९८ कोटी हे भारत सरकारचे योगदान आहे). असे फडणवीस यांनी म्हंटल

- Advertisement -

भारत सरकारने MIDC ला मान्यता दिली आहे आणि केंद्रीय मंत्र्यांनी काही मिनिटांपूर्वी नवी दिल्ली येथे महाराष्ट्राला ही मान्यता जाहीर केली. मला हे सांगायला देखील आनंद होत आहे की अँकर क्लायंट मेसर्स IFB रेफ्रिजरेशन लिमिटेडने ₹450 कोटीच्या अंदाजित गुंतवणुकीसह आपले काम आधीच सुरू केले आहे अशी माहिती फडणवीसांनी दिली .

हे EMC औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, सोलर पीव्ही उत्पादन, ई-मोबिलिटी उत्पादने/घटक इत्यादींच्या युनिट्सला लक्ष्य करेल. केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर जी महाराष्ट्राच्या प्रस्तावावर विचार आणि त्वरित मंजुरी दिल्याबद्दल धन्यवाद असं ट्विट करत फडणवीसांनी या प्रकल्पांबाबत माहिती दिली.