हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ओमीक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएन्टचा शिरकाव झाला कर्नाटक येथे 2 रुग्ण सापडले आहेत. या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली असून आता देशात पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तर दिले लॉकडाउन ची सध्या गरज नसल्याचे म्हंटल आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत देशात Omicron Varient चे दोन रूग्ण आढळल्याची माहिती काल दिली होती. त्यानंतर भारतात पुन्हा लाॅकडाऊन लागणार का?, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. देशात लाॅकडाऊन लावण्याची आताच गरज नाही, असं सुचक वक्तव्य डॉ. पॉल यांनी केलं आहे.
दरम्यान, कर्नाटक राज्यात ओमीक्रोन चे 2 रुग्ण आढळले आहेत. दोन्ही रुग्ण दक्षिण आफ्रिका वरून भारतात आले होते. कर्नाटकात सापडलेल्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण 11 तारखेला तर दुसरा 20 नोव्हेंबरला भारतात आला होता. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आता ओमिक्रॉनचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.