कोकणातून उद्रेक होण्यापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – निलेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेलय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पायावसाचा पश्चिम महाराष्ट्रालाही तडाका बसला आहे. ऐन हिवाळ्यात पडलेल्या या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू फळ पिकांच्या मोहोरावर परिणाम झाला असून नुकसान झाले आहे. या नुकसानीवरून भाजप नेते निलेश राणे यांनी राज्य सरकावर निशाणा साधला आहे. “कोकणातून उद्रेक होण्यापूर्वी शासनाने याचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,’ अशी मागणी राणे यांनी केली आहे.

निलेश राणे यांनी आपल्या ट्वटमध्ये म्हंटले आहे की, “गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा, काजू पिकला मोठा फटका बसलाय. अचानक झालेल्या या वातावरणीय बदलांमुळे सिजनातील उत्पन्नाची शाश्वती संपलीय. कोकणातून उद्रेक होण्यापूर्वी शासनाने याचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,” अशी मागणी राणे यांनी केली आहे.

बुधवारी रात्रीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. ती गुरुवारी सायंकाळपर्यंत संततधार कायम होती. ऐन हिवाळ्यात पडणार्‍या या पावसामुळे आंबा, काजू फळ पिकांच्या मोहोरावर परिणाम झाला आहे. खरीप हंगामातील सुगीची कामेही खोळंबली आहेत. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाचे सावट जिल्ह्यावर कायम आहे. या अस्मानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.

You might also like