हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्यातील कॅबिनेट मंत्री अनिल परब यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यानंतर परब यांच्या किनारपट्टी भागातील रिसॉर्टवर केंद्र सरकारच्या वतीने लवकरच कारवाई करण्याची शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कॅबिनेट मंत्री अनिल परब यांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी नोटीस दिली होती. नोटिशीमध्ये लवकरात लवकर सीआरझेड अंतर्गत येणाऱ्या रिसोर्टचे बांधकाम पाडावे अशी सूचना देण्यात आली होती. त्यामध्ये आपल्याविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई करण्याची ताकीत केंद्र सरकारने दिली होती. यासाठी परब यांना मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र, आता मुदतीचा कालावधी पूर्ण झालयामुळे केंद्र सरकारच्यावतीने आठवडाभरात पुन्हा एकदा नोटीस बजावून कारवाई करण्याची शक्यता आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या सीआरझेड अंतर्गत येणारे या संपत्तीच्या मुद्द्यावरून अनेक पुरावे सादर केले आहेत. सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत त्याबाबत त्याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्यातर्फे अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या संपत्तीची पाहणी करण्यात आली होती. तसेच केंद्र सरकारच्या वतीने परब यांना हे बांधकाम तोडण्या करीत दिलेली मुदत संपलेली आहे. त्यामुळे परब यांच्याविरुद्ध गुन्हेगारी कलमांतर्गत कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे