हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या मोटार वाहन कायद्यात बदल केले आहेत. केंद्रीय मोटार वाहन नियमात शासनाने जारी केलेल्या नवीन सुधारणांनुसार,आता कार या टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमने सुसज्ज असतील किंवा त्यामध्ये टायर रिपेयरिंग किट असेल तर कारमध्ये सुटे टायर ठेवण्याची गरज नसेल. बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. कारमध्ये अतिरिक्त टायर नसल्यास अधिक जागा मिळेल आणि त्यामध्ये मोठी बॅटरी ठेवली जाईल.
देशातील कार्बन फुटप्रिंट मध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यावरणविषयक समस्येवर भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार अनेक उपाययोजना करीत आहे. हे नवीन फेरबदल करून, इलेक्ट्रिक वाहनाची मोठी बॅटरी त्या रिकाम्या जागेत ठेवली जाऊ शकते, ज्यामुळे वाहनाची रेंज वाढेल. देशातील इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांची सर्वात मोठी चिंता म्हणजे त्याचे मायलेज आहे.
वाहनांमध्ये अतिरिक्त टायर ठेवण्याच्या आवश्यकतेत बदल केले गेले आहेत. या नवीन दुरुस्तीत वाहनांमधील इन-बिल्ड टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (टीपीएमएस) जरुरुई नाही आहे. याबाबत असे म्हटले आहे की कंपन्यांनी टायर रिपेयरिंग किट आणि टीपीएमएस वाहनांमध्ये दिल्यास अशा वाहनांमध्ये आता अतिरिक्त टायर्स ठेवण्याची आवश्यकता दूर होते आणि लोकांना अतिरिक्त टायर ठेवण्याची गरज राहत नाही.
टीपीएमएस ड्रायव्हरला टायरच्या प्रेशरविषयी सांगते आणि इशारा देते की खराब टायरमध्ये वाहन चालविणे हे धोकादायक सिद्ध होऊ शकते. टीपीएमएस लो टायर प्रेशर इंडिकेटर पिवळ्या प्रतीक आहे जे डॅशबोर्ड इन्स्ट्रुमेंट पॅनेलवर सिग्नल देतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.