मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राजस्थान रॉयल्सचा लेगस्पिनर युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) इंडियन प्रीमियर लीगमध्ये इतिहास रचला आहे. त्याने शनिवारी पंजाब किंग्ज विरुद्ध तीन विकेट घेत एक विशेष विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने आपल्या संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) या मोसमात 11 सामने खेळून 22 विकेट घेतल्या आहेत.
त्याच्या या कामगिरीमुळे त्याने आयपीएलच्या इतिहासातील कोणत्याही 4 हंगामात 20 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आणि पहिला फिरकी गोलंदाज बनण्याचा मान मिळवला आहे. या अगोदर असा पराक्रम श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने केला होता. यापूर्वी, आरसीबीकडून खेळताना चहलने 2015, 2016 आणि 2020 च्या हंगामात 20 किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या होत्या.
आरसीबीने सोडले, राजस्थानने विकत घेतले
चहलने (Yuzvendra Chahal) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली. गेल्या मोसमापर्यंत तो या संघासोबत खेळला. मात्र यंदाच्या सीझनमध्ये आरसीबीने चहलला विकत घेतले नाही. यानंतर मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने चहलला 6.50 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले. विशेष म्हणजे या मोसमात लसिथ मलिंगा राजस्थान संघाचा गोलंदाजी प्रशिक्षकही आहे. मलिंगा हा आयपीएलमधील पहिला गोलंदाज होता, ज्याने कोणत्याही 4 हंगामात 20 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या. मलिंगाने 2011, 2012, 2013 आणि 2015 च्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून खेळताना हि कामगिरी केली होती.
हे पण वाचा
वर्षातील पहिले चंद्रग्रहण लवकरच; तारीख, वेळ आणि सुतक कालावधी जाणून घ्या
15 दिवसांत पैसे डबल…; ‘या’ कंपनीच्या शेअर्सने केली कमाल
वेडात मराठे ‘वीर दौडले सात’! शिवरायांच्या पराक्रमी वीरांचा जाज्वल्य इतिहास रुपेरी पडद्यावर झळकणार