औरंगाबाद – केरळ मध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आता प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार पुढील पाच ते सहा दिवस तापमानात मात्र तफावत जाणवणार नाही. परंतु मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तवला आहे.
आज मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये वादळीवारा, मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
या दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 5 जुन ते 11 जुन दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे राहील असेही हवामान खात्याने सांगितले आहे.