फडणवीसांच्या मनातील सूर्याला आम्ही भीक घालत नाही : दिपाली सय्यद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्यावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल टीका केली होती. त्यांच्या टीकेला आज सय्यद यांनी उत्तर दिले आहे. “फडणवीस साहेब तुमच्या मनातील सुर्या पेक्षा हा आमचा संयुक्त महाराष्ट्र खुप मोठा आहे. त्यात आग लावण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या मनातील सुर्याला सुद्धा आम्ही भिक घालणार नाही, असे सय्यद यांनी ट्विट करत म्हंटले आहे.

दिपाली सय्यद यांनी नुकतेच एक ट्विट केले असून त्यांनी ट्विटच्या माध्यमातून पुन्हा नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, फडणवीस साहेब शिवसेना अंगार है. तुमच्या मनातील सुर्या पेक्षा हा आमचा संयुक्त महाराष्ट्र आम्हाला खुप मोठा आहे. त्यात आग लावण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या मनातील सुर्याला सुद्धा आम्ही भिक घालणार नाही. सुर्यावर कसे थुंकतात याचे धडे आम्हाला श्रीलंका कडुन घेण्याची गरज नाही, असे सय्यद यांनी म्हंटले आहे.

 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

काल पुण्यात देवेंद्र फडणवीस यांनी दिपाली सय्यद यांच्यावर टीका केली होती. यावेळी ते म्हणाले होते की, “सूर्याकडे पाहून थुंकलं तर ती थुंकी स्वत:च्या तोंडावर पडते, त्यांनी सुर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रकार केला आहे. त्यांमुळे थुंकी त्यांच्याच तोंडावर पडेल.”, अशी टीका फडणवीस यांनी सय्यद यांच्यावर केली.

Leave a Comment