मनोहर पर्रिकरांच्या मुलाला भाजप तिकीट नाकारणार?? फडणवीसांच्या विधानानंतर चर्चाना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते मनोहर पर्रिकरांचा मुलगा उत्पल्ल पर्रिकर यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ,तर भाजप उत्पल्ल पर्रिकरांच्या उमेदवारीसाठी फारशी उत्सुक दिसत नाही. त्यातच गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानाने उत्पल्ल पर्रिकरांच्या आशा मावळाल्याची चिन्हे दिसत आहेत

काय म्हणाले फडणवीस-

उत्पल्ल पर्रिकर याना तिकीट मिळणार का असा प्रश्न फडणवीस याना केला असता ते म्हणाले, केवळ मनोहरभाईंचा किंवा एखाद्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून भारतीय जनता पार्टीत तिकीट मिळत नाही. त्यांचं कर्तृत्व असेल तर त्यांचा विचार होतो. त्यामुळे या संदर्भातला जो निर्णय घ्यायचाय, तो मी घेऊ शकत नाही, आमचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे, हेच त्यासंदर्भातलं निर्णय घेऊ शकतं. असे सूचक विधान फडणवीसांनी केलं

उत्पल्ल पर्रिकर यांनी धाडस दाखवावे – संजय राऊतांचे आवाहन

उत्पल्ल पर्रिकर याना भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमी दिसताच शिवसेनेने त्याना गळाला लावण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. त्याचाच भाग म्हणून गोव्यात ठाण मांडून बसलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे राजकारणात टिकण्यासाठी जे एक धाडस असायला लागतं ते उत्पल पर्रिकर दाखवणार का हा सर्वस्वी त्यांना निर्णय घ्यायचाय असं राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले. दरम्यान या सर्व घडामोडीनंतर उत्पल्ल पर्रिकरमोठा निर्णय घेणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे