हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरीही ईडीने धाड टाकल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. ईडी कारवाईनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या याना पोपटलाल म्हंटल होत तर आता माजी खासदार चंद्रकांत यांनी सोमय्या हे ईडीच्या पैशातून कमिशन घेतात असा गंभीर आरोप केला आहे.
चंद्रकांत खैरे यांनी जालना दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार निशाणा साधला. किरीट सोमय्या ईडीचा दलाल आहे. ईडीच्या पैशातून त्यांना कमिशन मिळतं. हे असेच असतात. इन्कम टॅक्सला ज्या खबऱ्याने माहिती दिली, त्या खबऱ्याला त्यांना काहीतरी द्यावे लागत असते. तसेच याचं काम आहे. ईडीच्या कारवाईबाबत आधीच या माणसाला कस काय कळत असा सवालही त्यांनी केला.
दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही सोमय्या यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. स्वच्छता दूत’ आणि ज्यांच्यामुळे भाजपचं सरकार सत्तेत आलं, असे किरीट सोमय्या ते राजकारणी कमी आणि माहिती अधिकार कार्यकर्तेच अधिक आहेत. त्यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर १७५ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. सरनाईक यांच्यावर आरोप करण्यासाठी सोमय्या यांनी २२ पत्रकार परिषदा घेतल्या. याशिवाय आनंद अडसुळांसाठी त्यांनी ६ पत्रकार परिषदा घेतल्या. भावना गवळींसाठी त्यांनी ८ पत्रकार परिषदा घेतल्या त्याच काय झालं असं म्हणत त्यांनी सोमय्यांनी केलेल्या आरोपांचा रेकॉर्डच काढलं.