हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आतापर्यंत या निवडणुकीत भाजपला 24 जागा तर महाविकास आघाडीला 66 जागा मिळालेल्या आहेत. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे. “भाजपा महाराष्ट्रातला क्रमांक एकचा पक्ष आहे, हे आज पुन्हा एकदा हे सिद्ध झालं. अजुनही आम्ही म्हणत आहोत की एकएकटे लढा मग पाहुयात कोणाची ताकद जास्त आहे.” असे आव्हान पाटील यांनी दिले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारपरिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील महत्वाच्या अशा 106 नगरपंचायतींचे निकाल लागत आहेत. त्यातील सात नगरपंचायतींचे निकाल उद्या लागतील. म्हणजे जवळपास 99 नगरपंचायतींचे निकाल पूर्ण लागले आहेत. या निवडणुकांचे निकाल पाहिल्यास असे लक्षात येईल की, पुन्हा एकदा भाजपा महाराष्ट्रातला क्रमांक एकचा पक्ष आहे. हे सिद्ध झाले आहार. सदस्य संख्येत देखील भाजपा क्रमांक एकवर आहे.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 19, 2022
“राज्यातील नगरपंचायती पूर्ण जिंकणे आणि भाजपाच्या पाठिंब्याने जिंकणे यात देखील भाजपा क्रमांक एकवर हे सिद्ध झाले आहे. आम्ही वारंवार सांगत आलेलो आहे की, महाराष्ट्रात लढायचे असेल तर वेगवेगळे लढा आणि मग कोणाची ताकद जास्त आहे ते पाहू, असे पाटील यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारबाबत म्हंटले.