चंद्रकांत दादांनी घेतली ज्ञानदेव रांजणे यांची भेट; जिल्हा बँकेबाबत केलं ‘हे’ मोठं विधान

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना अवघ्या एका मताने पराभव करत जायंट किलर ठरलेलं ज्ञानदेव रांजणे यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा बँकेबाबत मोठं विधान करत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची सूत्रे भाजपकडे येत असतील तर लागेल ती मदत करू, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, रांजणे यांची सदिच्छा भेट घेतली. मी विद्यार्थी चळवळीतून आलेला माणूस आहे. संघर्ष करत आलोय. त्यामुळं संघर्ष करणाऱ्या माणसाबद्दल मला अप्रूप असतं. मी तशा लोकांना भेटतो. मी त्यांना भेटल्यामुळं रांजणेंची निष्ठा बदलत नाही. कुठल्याही दबावाला ते बळी पडले नाहीत याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला आलो, असं पाटील यांनी सांगितलं. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची सूत्रे भाजपकडे येत असतील तर लागेल ती मदत करू, असंही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला. चंद्रकांत पाटील हे आता हस्तपरिक्षा पाहतात असं वाटतय असं विधान केलं पवारांनी होत‌ं त्यांच्या या विधाना नंतर चंद्रकांत पाटील यांनी निशाना साधलाय सरकार पडेल असं म्हटलं तर कोणाच्या पोटात दुखायची गरज नाही असं नाव न घेता चंद्रकांत पाटील यांनी निशाना साधला