शिवसेना फोडण्याची तयारी अडीच वर्षांपासून?? चंद्रकांत पाटलांच्या विधानाने चर्चाना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात भाजपचे सरकार आणण्यासाठी गेल्या दोन-अडीच वर्षांपासून प्लॅनिंग सुरु होते, असा मोठा खुलासा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच मी सातत्याने म्हणायचं हे सरकार पडणार, मी काय वेडा नव्हतो. मला माहीत होत असेही ते म्हणाले. पुण्यात भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते.

दोन अडीच वर्षे मी म्हणत होतो की, आपलं सरकार येणार, मी काही वेडा नव्हतो, मला माहिती होत की आपलं सरकार येणार. त्याची योजना माझ्या मनात होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला कार्यकर्त्यांना विश्वास द्यायचा होता. तसेच ४० जणांना बाहेर काढणे सोपे नव्हते. त्यासाठी वेळ लागणार होता.

आपण टाइमिंग साधला आणि आपले सरकार आलं. एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय घेतला आहे, त्याला मोठं धाडस लागतं. त्यामुळे आम्ही त्यांना अंतर जाणवू देणार नाही असेही ते म्हणाले. चंद्रकांत पाटलांच्या या दाव्याने खरच अडीच वर्षापासूनच शिवसेना फोडणायचे काम सुरु होते का अशा चर्चाना उधाण आलं आहे.