सातारा प्रतिनिधी | उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला माझा कसलाही विरोध नाही. अथवा मी कसलाही खोडा घालत नाही. उदयनराजे पुढील आठवड्यात दिल्लीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश करतील असे चंद्रकांत पाटील यांनी म्हणले आहे. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.
उदयनराजेंच्या प्रवेशाबाबत मी त्यांच्याशी काल बोललो असून ते येत्या आठवड्यात दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करतील असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.त्याच बरोबर त्यांनी आपण कोणत्याही प्रकारचा त्यांच्या पक्ष प्रवेशाला खोडा घालत नाही असे देखील पाटील म्हणले आहेत. सोलापूर येथे होणाऱ्या अमित शहा यांच्या सभेतच उदयनराजेंच्या भाजप प्रवेश करायाचा होता. मात्र उदयनराजे म्हणले की मी दिल्लीत प्रवेश घेणार. यावर मी काहीच बोललो नाही. कारण ते शेवटी राजे आहेत अशी मिश्किल टिप्पणी देखील चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजे यांच्यावर केली आहे.
उदयनराजे यांच्यासह नारायण राणे यांच्या प्रवेशाचे देखील निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री यासंदर्भात वरिष्ठ नेत्यांशी आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत बोलणार आहे. त्यानंतर नारायण राणे यांना देखील पक्ष प्रवेश दिला जाईल. त्यांचा प्रवेश झाल्या शिवाय त्यांच्या मुलाला तिकीट देण्याच्या वाटाघाटी होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर प्रवेश देण्यात येईल असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.