हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये आरोप – प्रत्यारोपाच्या फैली होत आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तब्बल 4 वेळा पत्र लिहून देखील त्यांनी भेटीसाठी वेळ दिला नाही असा आरोप छत्रपती संभाजी राजे यांनी केला. त्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे.
मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी भेट होऊ शकली नाही अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.
संभाजीराजेंचा आरोप काय –
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.