मला चंपा म्हणणं थांबवा, अन्यथा…; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर येथील प्रचारसभेत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख पुन्हा एकदा चंपा असा केल्याने चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त करत अजित पवारांना इशारा दिला आहे.

खूप दिवस मला चंपा म्हणणं त्यांच्या लोकांनी थांबवलं होतं. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असं सांगितलं होतं. आता हे थांबलं नाही तर त्यांचीसुद्धा जी शॉर्ट फॉर्म आहेत…त्यांच्या मुलापासून सर्वांची शॉर्ट फॉर्म मला करावी लागतील,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

जरी शरद पवार यांच्यावरील पीएचडी अजून पूर्ण झाली नसली, तरी आता मी अजित पवार यांच्यावरही एम फील करायचा निर्णय घेतला आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. राज्यात साखर कारखाने आजारी झाले की, ते विकत घ्यायचा सपाट पवार कुटुंब करीत असून आता त्यांनी आपल्या कडील कारखान्यांच्या माहितीची श्वेतपत्रिका काढा, असं म्हणत निशाणाही साधला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like