हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोल्हापुरात कोरोनाचा अधिक प्रसार होत असल्याने सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी पवार यांनी आपल्यावर वारंवार टीका करणाऱ्या भाजपचे प्रदेशाद्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जहरी टीका केली. “चंद्रकांत पाटील यांची बुद्धी विनाशकाले विपरीत अशी झाली आहे. ते दुर्देयवाने मंत्रिमंडळात नाहीत. त्यामुळे त्यांना खरी वस्तुस्थिती माहित नाही,” अशा शब्दात पवार यांनी पाटील यांच्यावर टीका केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापुरास भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी भाजपचे प्रदेशाद्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. यावेळी पवार म्हणाले “कोल्हापुरात आम्ही आलो आहे. राजकारणात काहीही बोलायचं नाही. चंद्रकांत पाटील याना मंत्रिमंडळात नसल्याने खरी परिस्थिती माहित नाही.
चंद्रकांत पाटील यांनी खरी माहिती घेऊन बोलावे. चंद्रकांत पाटील यांनी उगाच काहीही बोलून जनतेची दिशाभूल करण्याचं काम करू नये. त्यांचं दुर्दैवच म्हणावं लागेल कि ते सध्या मंत्रिमंडळात नाहीत ते. मंत्रिमंडळात ते नसल्यामुळेच ते काहीही बोलत आहेत, असे पवार यांनी सांगितले.